Ad will apear here
Next
‘नेहरू, इंदिराजींनंतर मोदीच’
रामचंद्र गुहानवी दिल्ली : ‘देशाचे पहिले पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्यानंतर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वांत यशस्वी पंतप्रधानांच्या यादीत क्रमांक लागू शकतो,’ असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले. ‘मोदींच्या करिष्म्याला जाती आणि भाषांच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत,’ असेही ते म्हणले. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इंडिया समिट २०१७’मध्ये ते बोलत होते.

‘पंतप्रधान मोदी यांची कारभारावरील हुकूमत आणि त्यांचा अखिल भारतीय दृष्टिकोन त्यांना नेहरू आणि इंदिरा गांधींच्या पंक्तीत नेऊन बसवतो. नेहरू आणि इंदिराजींनंतर इतकी पकड असणारा पंतप्रधान झालेला नाही. ज्याच्या लोकप्रियतेला जाती, भाषा, प्रादेशिकतेच्या मर्यादा नाहीत, असा पंतप्रधान झाला नाही. हेच साम्य मोदींना नेहरू आणि इंदिराजींनंतरचे यशस्वी पंतप्रधान बनवतात,’ असे डॉ. गुहा म्हणाले. 

या वेळी भारतीय राजकारणाच्या इतिहासावर भाष्य करताना गुहा यांनी जाती प्रथा आणि महिलांना सापत्न वागणूक या बाबी निर्विवाद खऱ्या असल्याचे नमूद केले. डॉ. गुहा हे मोदींचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी मोदींच्या विरोधात अनेकदा भाष्य केले आहे. तसे केल्याने आपल्याला धमक्यांचे ई-मेल आले, असेही ट्विट त्यांनी केले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XYUNBA
Similar Posts
‘अशांततेपेक्षा नवनिर्माणाचा ध्यास घ्या’ उधमपूर : ‘काश्मीरच्या युवकांना पर्यटन हवे की दहशतवाद? काश्मीरमध्ये काही तरुण दगडफेक करत आहेत, तर काही तरुण दगड फोडून पायाभूत सुविधा भक्कम करण्याचे काम करत आहेत. तुम्हाला नवनिर्माण करायचे आहे, की अशांतता निर्माण करायची आहे याचा निर्णय तुम्हीच घ्यावा. राज्याचा विकास आणि समृद्धीसाठी दहशतवादापेक्षा पर्यटनाचा
संकर्षण कऱ्हाडेची सुषमा स्वराज यांना काव्यातून आदरांजली पुणे : ‘आईसमान वाटे त्यांचे सुष’मा’ ऐसे नाव..’ अशा शब्दांत कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांचे सहा ऑगस्टला रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अचानक झालेले निधन सर्वांनाच चटका लावून गेले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संकर्षण कऱ्हाडे याने कविता केली आहे
नेताजींच्या पराक्रमाच्या साक्षीदार वस्तूंचे लाल किल्ल्यात संग्रहालय नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित असलेली तीन संग्रहालये लाल किल्ल्यात सुरू करण्यात आली असून, २३ जानेवारी २०१९ रोजी त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही संग्रहालये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना, जालियनवाला बाग हत्याकांड आणि १८५७चे स्वातंत्र्यसमर या विषयांना वाहिलेली आहेत
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language